breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

इस्त्रोची मोठी घोषणा! चंद्रानंतर भारताचं पुढील लक्ष्य सुर्य

ISRO Mission Aditya : भारताची ‘चांद्रयान-३’ मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता पुढील अंतराळ मोहिमेची चर्चा सुरू झाली आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी सुर्य आणि शुक्राच्या दिशेने आगेकूच करायचे ठरवले आहे. इस्रोकडून येत्या काही दिवसात ‘आदित्य एल-१’ ही सौर मोहीम सुरू होणार आहे. या ‘आदित्य एल-१’ च्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

सूर्य मोहिमेसाठी ‘आदित्य-एल१’ उपग्रह सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रक्षेपित केला जाईल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली. हे मिशन साधारण १२० दिवसांचे म्हणजेच ४ महिन्यांचे असेल. या कालावधीत उपग्रह १५ लाख किमी अंतर कापून सूर्याच्या कक्षेत पोहोचणार आहे. तेथील सौर वातावरणाचा अभ्यास करत माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा – Pune : पुण्याहून कोकणात जाणारा ‘हा’ घाट उद्यापासून खुला

‘आदित्य-एल१’ चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून केले जाणार आहे. सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ आधारित भारतीय वेधशाळा तेथे तयार केली जात आहे. सूर्य मोहिमेवर जाणारे अंतराळ यान सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या पहिल्या लॅग्रेंज पॉइंट L१ भोवती प्रभामंडल कक्षेत ठेवले जाणार असल्याची माहिती इस्रोने शेअर केली आहे. L१ बिंदूच्या सभोवतालच्या उपग्रहाला कोणतेही ग्रहण न होता सूर्य सतत पाहण्याचा मोठा फायदा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button