breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेश

Israel-Palestine Crisis : इस्त्रायलमध्ये परिस्थिती गंभीर! अनेक महिला बेपत्ता

Israel-Palestine Crisis : हमास दहशतवादी संघटनेनं इस्त्रायलवर हल्ला केला आहे. हमासाने एकाच वेळी पाच हजार रॉकेट सोडल्याने इस्त्रायलमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हमासने हल्ला केल्यानंतर इस्त्रायलच्या अनेक महिला बेपत्ता झाल्या असल्याची माहिती मिळत आहे.

हमास दहशतवादी संघटनेकडून बलात्काराचा शस्त्र म्हणून वापर केला जात असल्याची भीती ‘इस्रायल वॉर रुम’कडून व्यक्त करण्यात आली आहे. ‘इस्रायल वॉर रुम’ या स्वयंसेवी संस्थेनं आपल्या अधिकृत अकाऊंटवर हमासच्या हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या महिलांचा फोटो शेअर केला. यावेळी हमासकडून शस्त्र म्हणून बलात्काराचा वापर केला जात असल्याची भीती व्यक्त केली.

हेही वाचा – Indian Air Force : भारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज! काय आहे खासियत 

हमास या दहशतवादी संघटनेनं बहुतेक महिलांचं अपहरण केल्याचं दिसत आहे. हमासचे दहशतवादी बलात्काराचा वापर युद्धाचं शस्त्र म्हणून करत असल्याची पुष्टी यापूर्वीच झाली आहे. या रानटी लोकांवर दयामाया दाखवली जाऊ नये, असं इस्त्रायल वॉर रूमने म्हटलं आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी एका महिलेच्या नग्न मृतदेहाची धिंड काढली. यावेळी काही लोक तिच्या मृतदेहावर थुंकताना व्हायरल व्हिडीओत दिसत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button