सरकारची मोठी घोषणा! सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्सना ५ लाखांपर्यंत मिळणार जाहिरात
![Influencers will get up to 5 lakhs of advertising on social media](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Influencers-780x470.jpg)
मुंबई : सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारने राज्यातील सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्सना ५ लाख रुपयांपर्यंतच्या जाहिराती देण्याची घोषणा केली आहे.
माहिती आणि जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम किंवा यूट्यूबवर १०,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या कोणालाही १०,००० रुपयांपासून ते ५ लाख रुपयांपर्यंत दरमहा जाहिराती मिळू शकतात.
हेही वाचा – Pune : डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्यांना बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, माहिती आणि जनसंपर्क विभागाने (DIPR) लवकरच अशा प्रभावशाली लोकांचे एक पॅनेल तयार करणार आहे. त्यानंतर एक-दोन आठवड्यात संपूर्ण प्रक्रिया सुरू होईल. DIPR ने फॉलोअर्सच्या संख्येवर आधारित इन्फ्लुएन्सर्ससाठी चार कॅटेगरी तयार केल्या आहेत. यामध्ये फॉलोअर्सचा मागच्या सहा महिन्यांचा रेकॉर्ड तपासला जाणार आहे.
दरमहा किमान १० लाख आणि कमला ५ लाखांची जहिरात
५ लाखांवर फॉलोअर्स असणाऱ्यांसाठी २ लाखांची जहिरात
१ लखांवर फॉलोअर्स असणाऱ्यांसाठी ५० हजारांची जहिरात
१० हजारांवर फॉलोअर्स असणाऱ्यांसाठी १० हजारांची जहिरात