इंडोनेशिया : कारागृहास भीषण आग, ४१ कैद्यांचा होरपळून अंत
![Indonesia: Prison fire kills 41 inmates](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Indo.jpg)
जकार्ता – इंडोनेशिया मधील कारागृहात आग लागून ४१ कैद्यांचा होरपळून मृत्यू झाला. ३९ कैदी गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती इंडोनेशिया येथील कायदा आणि मानवाधिकार मंत्रालयच्या कारागृह विभागाच्या प्रवक्त्या रीका अप्रिंती यांनी दिली.
बॅन्टेन कारागृहात बुधवारी पहाटे अचानक आग लागली. संपूर्ण कारागृह इमारत रिकामी करण्यात आली. काही तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही, असेही अप्रिंती यांनी म्हटले आहे.टेंगरंग कारागृहाची क्षमता १ हजार २२५ कैदी ठेवण्याचीच होती. मात्र यामध्ये दोन हजारांहून अधिक कैदी होते. बुधवारी पहाटे अचानक आग लागल्याने ब्लॉक सीमध्ये अंमलपदार्थ तस्कारातील कैदी होते. या ब्लॉकमधील ४१ कैद्यांचा होरपळून मृत्यू झाला. ३९ कैदी गंभीर जखमी झाले आहेत.
कारागृहाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
आगीच्या दुर्घटनेनंतर कारागृहाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. इंडोनेशियामधील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे येथील कारागृहांमध्ये कैद्यांमध्ये धुमश्चक्री आणि आग लागण्याची घटना नेहमी घडत असतात. आगीची दुर्घटना घडलेल्या कारागृहात मोठ्या संख्येने अंमली पदार्थाच्या गुन्ह्यातील आरोपींना ठेवण्यात आले हाेते.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेच्या चाौकशीचे आदेश देण्यात आले आहे.जखमी कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेच्या चाौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही कारागृह प्रशासनाने सांगितले.