युनोच्या मानवाधिकार परिषदेतील रशिया निषेध ठरावात भारत तटस्थ
![India neutral in UN Security Council resolution condemning Russia](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/uno.png)
न्यूयॉर्क | संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत मांडलेल्या रशियाच्या निषेध ठरावात भारताने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. रशियन सैनिकांनी युक्रेनमध्ये मानवी हक्काचे उल्लंघन केल्यामुळे हा निषेधाचा ठराव मांडला. त्याला ३२ देशांनी पाठिंबा दिला. मात्र भारतासह १३ देशांनी तटस्थ राहणे पसंत केले. दोन देशांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले.
रशियाने यूक्रेनवर हल्ला चढवला. या युद्धात युक्रेनमध्ये रशियन सैनिक मानवी हक्काचे उल्लंघन करत आहे. त्यासंदर्भात त्रिसदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे. रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानंतर संयुक्त राष्ट्रासह अनेक संस्थांनी रशियाच्या विरोधात अनेक ठराव केले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या मानव अधिकार परिषदेतही मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रशियाच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. त्यावर मतदान घेण्यात आले. या मतदानात भारताने भाग न घेता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. इतर १२ देशांनीही मतदानात भाग घेतला नाही. त्यामुळे १३ देश तटस्थ राहिले. त्यात चीन, श्रीलंका, बांगलादेश, एंगोलिया, दक्षिण आफ्रिका, अल्जेरिया, इराण, अल्जेरिया, इराक, व्हिएतनाम, क्यूबा, मंगोलिया आदी देशांचा समावेश आहे. रशिया आणि इरिट्रिया यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. ५ देशांनी रशियाला उघडपणे पाठिंबा दिला.