breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियविदर्भ

शरद पवारांच्या उपस्थितीत ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई: राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापला असताना चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी राजकीय घडामोड पुढे आली आहे. विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलाय. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

पूर्व विदर्भातील शैक्षणिक चळवळीचे जनक स्व. श्रीहरी जिवतोडे यांचा वारसा तेवढ्याच सक्षमपणे चालविणारे, सामाजिक, सांस्कृतिक आणि नजीकच्या काळात राजकीय क्षेत्रातील प्रतिथयश नेता म्हणून नाव लौकिक असलेले, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक, विदर्भवादी नेतृत्त्व डॉ. अशोक जीवतोडे यांनी अचानकपणे मुंबई स्थित यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला. डॉ. अशोक जीवतोडे हे चंद्रपुरातच नव्हे तर विदर्भात ओबीसी चळवळ पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या रूपाने विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसी नेतृत्व मिळाल्याचे बोलले जात आहे.

 

मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठान येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. चंद्रपूर आणि विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज असलेले प्रा. डॉ. जीवतोडे यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीने भाजपशी जवळीक असलेला एक मोहरा आपल्यात ओढून घेतल्याचे बोलले जात आहे. विदर्भाच्या विविध जिल्ह्यात पसरलेल्या शिक्षण संस्था आणि ओबीसी महासंघाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर कामाची छाप असलेले डॉ. जीवतोडे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात एक दमदार चेहरा मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button