देशात गेल्या 24 तासात 10 हजार 273 रुग्णांची नोंद, 243 जणांचा मृत्यू
![In the last 24 hours, 10 thousand 273 patients were registered in the country and 243 died](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/coronavirus-2.jpg)
नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 10 हजार 273 नवीन रुग्ण आढळले असून 243 लोकांचा मृत्यू झाला आहे. काल 11 हजार 499 कोरोना रुग्ण आढळले होते. म्हणजेच कालच्या तुलनेत आज रुग्ण कमी झाले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 11 हजार 472 इतकी कमी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 11 हजार 472 इतकी कमी झाली आहे. तर कोरोना महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 13 हजार 724 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 22 लाख 90 हजार 921 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत सुमारे 177 कोटी डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे सुमारे 177 कोटी डोस देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरात 24 लाख 5 हजार 49 लसींचे डोस देण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत 177 कोटी 44 लाख 8 हजार 129 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 1.99 कोटी (1,99,77,476) पेक्षा जास्त प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्या आहेत.