मध्यप्रदेशात अकरावी आणि बारावीचे वर्ग २६ जुलैपासून सुरु होणार
![In Madhya Pradesh, 11th and 12th classes will start from 26th July](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/competitive-exam-.jpg)
भोपाल – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लवकरच शाळा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. ११ आणि १२ वी चे वर्ग येत्या २६ जुलै पासून पन्नस टक्के क्षमतेने सुरु केले जाणार आहेत. तर १५ ऑगस्ट पर्यंत कोरोना परिस्थिती ठीक राहिल्यास शाळा तसेच कोचिंग क्लासही सुरु करण्याचा विचार केला जाईल, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवाजीराज सिंह चौहान एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले आहे की, कोरोन काळात जनतेने सावधता पाळणे जरुरी आहे. त्यामुळेएकदम सर्व विद्यार्थ्यांना न बोलावता एका आठवड्याला एक गट तर दुसऱ्यादिवशी दुसरा गट याप्रमाणे शाळेत बोलावले जाईल. त्यासाठी विध्यार्थांचे संपूर्ण नियोजन केले जाईल. लोकांनी जर कोरोना निर्बंधाचे पालन केले तर 9 वी आणि १० वी , मग ७ वी , 8 वी आणि त्यानंतर पहिली ते पाचवी अशी शाळा सुरु केली जाईल. गेल्या काही दिवसात मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दिवसाला कमाल २० ते २५ कोरोनाच्या चे रुग्ण सापडत आहेत.