भारतात २५,४६७ नवे कोरोनाग्रस्त, ३५४ कोरोनाबळी
![97% of patients in Mumbai are free from corona; 2% of citizens lost their lives](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-1-6.jpg)
नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नसून नव्या रुग्णांची मोठी आकडेवारी समोर येत आहे. काल, सोमवारी दिवसभरात देशात २५ हजार ४६७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर ३५४ जणांचा मृत्यू झाला. तसेच ३९ हजार ४८६ लोक कोरोनामुक्त झाले. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता ३ कोटी २४ लाख ७४ हजार ७७३ वर पोहोचली आहे. यापैकी ३ कोटी १७ लाख २० हजार ११२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर ४ लाख ३५ हजार ११० कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. तसेच सध्या ३ लाख १९ हजार ५५१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
देशात सक्रिय रुग्णसंख्या सध्या सव्वातीन लाखांच्या खाली आहे. त्यातच कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. तसेच आतापर्यंत देशातील कोरोना लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या ५८ कोटी ८९ लाख ९७ हजार ८०५ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.