breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतात एका दिवसात तब्बल 1,03,558 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली – राज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असतानाच देशभरातही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. देशात मागील 24 तासांत आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंद करण्यात आली. भारतात काल दिवसभरात तब्बल 1,03,558 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 478 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,25,89,067 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,65,101 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 52,847 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,16,82,136 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 7,41,830 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

वाचा :-महाराष्ट्रात येणार केंद्रीय पथक; पंतप्रधान कार्यालयाची माहिती

दरम्यान, २०२० साली भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर काही महिन्यांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉक काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. सध्या भारतात कोरोना लसीकरण सुरू आहे, मात्र देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येतही सध्या मोठी वाढ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button