ताज्या घडामोडीराष्ट्रिय

सुपरमार्केटमध्ये ‘असा’ नकळत होतो खर्च

दुकानात यादी घेऊन जाऊन सामान खरेदी करण्यापेक्षा सुपरमार्केटमध्ये जाऊन सामान खरेदी करण्यावर आता अनेकांचा कल असतो. मात्र सुपरमार्केटमधील काही गोष्टींमुळे आपला खर्च नकळतपणे वाढतो, तो कसा आज आपण जाणून घेऊया.

आपण ब्रेड आणि बटर एकत्र वापरतो, मात्र सुपरमार्केटमध्ये या आणि अशा अनेक वस्तू बहुतेकवेळा शेजारी नसतात. यामागचे कारण म्हणजे यातली एक वस्तू घेतल्यानंतर दुसरी घेण्यासाठी आपण स्टोअरचा इतर भागही फिरतो. या दरम्यान इतर वस्तू ठेवलेल्या असतात. यामुळे इतर वस्तू खरेदीची शक्यताही वाढते. तसेच सुपरमार्केटमध्ये रोजच्या वापराच्या वस्तू म्हणजे डाळी, तेल, गहू, तांदूळ अशा वस्तू लांब ठेवलेल्या असतात. तर चॉकलेट, बिस्किट, कोल्डड्रिंक्स, चिप्स अशा वस्तू जवळ ठेवलेल्या असतात. त्यामुळे आपण ज्या वस्तू खरेदी करायच्या नसतात त्यादेखील नकळत खरेदी करतो.
सुपरमार्केटमध्ये गेल्यावर अशा अनेक वस्तू असतात ज्या आपण ऑफरमध्ये आहेत म्हणून किंवा एकावर एक फ्री आहेत म्हणून खरेदी करतो. म्हणजे आपल्याला एकाची गरज असते मात्र आपण एक किंवा अधिक खरेदी करतो.
सुपरमार्केटमधील शॉपिंग कार्ट आणि बास्केट आकाराने मोठ्या असतात. त्यामुळे ज्यावेळी आपण त्यात सामान टाकतो त्यावेळी शॉपिंग कार्ट किंवा बास्केटच्या तुलनेत सामान कमी दिसते. मग आपण अजून काहीच खरेदी केलेले नाही, असे आपल्याला वाटेत आणि आपली शॉपिंग नकळत वाढते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चेक आऊट काऊंटवर बिल भरण्यासाठी लांब लांब रांगा लागतात. नेमक्या तिथेच हाय मार्जिन वस्तू ठेवलेल्या असतात. आपण रांगेत उभे असता आपली नजर त्यावर पडते आणि विचार नसतानाही आपण त्यातील एखादी तरी वस्तू खरेदी करतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button