विंडशील्डवर FASTag नसल्यास भरावा तब्बल दंड, काय आहे NHAI चा नवा नियम?

Fastag | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नवा नियम बनवला आहे. या नव्या नियमानुसार, जे वाहनचालक वाहनाच्या समोरच्या विंडशील्डला फास्ट टॅग जोडत नाहीत, त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
प्रवासादरम्यान टोल भरण्यास टाळाटाळ करू नये, पेसे देताना वेळ वाया जाऊ नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. थकबाकीदारांना काळ्या यादीतही टाकले जाऊ शकते, असे एनएचएआयने म्हटले आहे.
हेही वाचा – पिंपरी- चिंचवडमध्ये ‘हिट ॲंण्ड रन’, रस्त्याच्या कडेला उभ्या महिलेला चिरडलं, व्हिडीओ व्हायरल
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून लागू करण्यात आलेल्या नव्या नियमानुसार, वाहनाच्या समोरच्या विंडशील्डला FASTag जोडणे बंधनकारक आहे. ज्या वाहनांवर FASTags नसेल अशा वाहनांचे वाहन नोंदणी क्रमांक (VRN) रेकॉर्ड करण्यासाठी टोल प्लाझाकडून CCTV चा वापर योग्य प्रकारे करण्यात येणार आहे.





