Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

बुधवारपर्यंत करार झाला नाही तर बॉम्बस्फोट होतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

Donald Trump | इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील तणाव निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, ८ एप्रिलपासून लागू असलेली ३९ दिवसांची शस्त्रसंधी बुधवारी संपणार आहे. त्या आधी शांतता करार न झाल्यास इराणवर पुन्हा मोठ्या प्रमाणात हल्ले केले जातील, असा थेट इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

पीबीएस न्यूज (PBS News) या वृत्तसंस्थेशी बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, बुधवारी संध्याकाळपर्यंत कोणताही करार झाला नाही तर इराणमध्ये पुन्हा बॉम्बहल्ले सुरू होतील. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शस्त्रसंधी वाढवण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे सांगितले. ट्रम्प यांच्या मते, या चर्चेचा मुख्य मुद्दा एकच आहे. इराणकडे कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे असता कामा नयेत.

हेही वाचा      :                    हिंदू धर्म म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीचे सायन्स : कालीचरण महाराज

शस्त्रसंधीची मुदत संपण्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी रवाना होत आहे. व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिष्टमंडळाचे नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स करणार आहेत. त्यांच्यासोबत अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कुशनर यांचाही समावेश असेल.

दरम्यान, अमेरिका चर्चेसाठी आग्रही असताना इराणकडून मात्र संमिश्र संकेत मिळत आहेत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाही यांनी सध्या अमेरिकेसोबत कोणत्याही चर्चेचे नियोजन नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी सांगितले की, इराणी अधिकारी चर्चेसाठी उपस्थित राहतील असे अपेक्षित होते; मात्र ते आले नाहीत तरी अमेरिकेच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button