१ मे पासून बदलणार ICICI बँकेचे नियम! ग्राहकांकडून घेणार जास्तीचे पैसे
![ICICI Bank rules to change from May 1](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/ICICI-Bank-New-Rules-780x470.jpg)
ICICI Bank New Rules | आयसीआयसीआय बँकेने अनेक नियमांत बदल केला आहे. नवे नियम येत्या एक मे रोजीपासून लागू होणार आहे. एटीएमचा उपयोग, डेबीट कार्ड, चेक बुक, आयपएमपीएस, स्पॉट पेमेंट अशा अनेक नियमांत आयसीआयसीआयने बदल केला आहे.
१ मे पासून बदलणार हे नियम :
ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्राहकांना डेबिट कार्डवर ९९ तर शहरी भागात राहणाऱ्या ग्राहकांकडून २०० रुपये द्यावे लागणार आहेत.
ICICI बँक पहिल्या 25 चेकवर कोणतीही फी आकारणार नाही. त्यानंतर चेक हवे असतील तर ग्राहकांना प्रतिपेज ४ रुपये मोजावे लागतील.
एखाद्या विशेष चेकसाठी १०० रुपये फी आकारली जाईल.
तुम्हाला तुमच्या पासबुकची नक्कल प्रत हवी असेल तर १०० रुपये जमा करावी लागतील.
हेही वाचा – ‘देशात सर्वाधिक कंडोम मुस्लीम लोक वापरतात..’; असदुद्दीन ओवैसींचं पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर
नवे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी तुम्हाला २०० रुपये मोजावे लागतील.
बचत खात्यावरील हस्ताक्षर व्हेरिफिकेशनसाठी ICICI बँक १०० रुपयांची फी आकारू शकते.
सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळी सहा वाजेनंतर कॅश डिपॉझिट मशिनमध्ये जमा केलेल्या रकमेच्या प्रत्येक ट्रान्झिशनवर ५० रुपये फी आकारणार आहे.
बँकेचे खाते बंद करण्यासाठी ग्राहकांना आता कोणतीही अतिरिक्त फी द्यावी लागणार नाही.
बॅलेन्स सर्टिफिकेट, इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळवायचे असेल तर त्याला कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाही.
अॅड्रेस व्हेरिफिकेशनसाठीदेखील पैसे देण्याची गरज नाही.
पत्ता बदलण्यासाठी अतिरिक्त फी देण्याची गरज नाही.