ताज्या घडामोडीदेश-विदेश

आयएएस कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक

परवानगीशिवाय तळघरात सुरू होती लायब्ररी, कोचिंग सेंटरवर कठोर कारवाई

दिल्ली : दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. या घटनेनंतर आता विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या कोचिंग सेंटरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी दिल्लीच्या महापौर शेली ओबेरॉय यांनी संबंधित कोचिंग सेंटरचे तळघर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, आता या कोचिंग सेंटरच्या मालकासह अन्य एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच या तळघरात परवानगीशिवाय लायब्ररी स्थापन करण्यात आली होती, अशीदेखील माहिती आहे.

परवानगी नसतानाही या इमारतीच्या तळघरात लायब्ररी सुरु करण्यात आली होती. या ठिकाणी वर्गदेखील घेतले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, या तळघराची परवानगी गोडाऊन म्हणून वापरण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, नियमांचे उल्लंघन करत यासाठिकाणी बेकायदा वाचनालय सुरु करण्यात आले होते. याप्रकरणी आता कोचिंग सेंटरच्या मालकासह एकाला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, १०६ (१), १५२, २९० आणि ३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button