एचयुएल आणि नेस्लेची दरवाढ
![HUL and Nestle price hike](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Capturesvvsbbbege.jpg)
सर्वसामान्यांचा चहा, कॉफी आणि बच्चे कंपनीची आवडती मॅगी महागली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्ले या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या दरात वाढ केली आहे. त्यानुसार मॅगी २ ते ९ रुपयांनी, कॉफी २.५ रुपयांनी आणि नेस्लेचे दूध ३ रुपयांनी महागले आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्ले इंडियाने चहा, कॉफी, दूध आणि नूडल्स या उत्पादनांच्या दरात वाढ केली आहे. कच्च्या मालाच्या दरात आणि वाहतुकीत वाढ झाल्यामुळे त्याच्या खर्चाचा जादा आर्थिक बोजा कंपन्यांवर पडत होता. त्यामुळे उत्पादनांच्या दरात वाढ करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. म्हणून मॅगीच्या दरात ९ ते १६ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे मॅगी २ ते ९ रुपयांनी महागली आहे. या दरवाढीमुळे ७० ग्रॅम मॅगीचे पाकीट १२ ऐवजी १४ रुपयांना मिळणार आहे. १४० ग्रॅमचे पाकीट ३ रुपयांनी महागले आहे. ५६० ग्रॅम ९६ रुपयांऐवजी १०५ रुपयांना मिळणार आहे. नेस्लेचे ए प्लस मिल्क १ लिटर कार्टन ७५ ऐवजी ७८ रुपये झाले आहे. नेस कॉफी क्लासिक २५ ग्रॅमचा पॅक अडीच रुपयांनी महागला आहे. त्यामुळे सकाळची चहा, कॉफी आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या मॅगीसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.