व्होट चोरी कशी केली जाते? राहुल गांधींनी केला मोठा खुलासा

नवी दिल्ली | लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मतदान प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत, सनसनाटी दावा केला आहे. त्यांनी स्पष्ट पुराव्यांसह ही माहिती मांडली असून, यामध्ये मतदारांची नावे हटवण्यासाठी त्यांच्या नावाने भलत्याच व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकांचा गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, की मी विरोधी पक्षनेता आहे, मी हे सहज बोलत नाहीये. सबळ पुरावा हातात असताना मी हे बोलत आहे. हा पुरावा एकदम स्पष्ट आहे की देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त अशा लोकांना वाचवत आहेत ज्यांनी भारतीय लोकशाही उद्ध्वस्त केली आहे. त्याशिवाय, ज्या पद्धतीने मतं वाढवली जात आहेत किंवा कमी केली जात आहेत हेही मी सांगणार आहे.
हेही वाचा : पुणे हादरलं! निलेश घायवळ टोळीतील चौघांकडून तरुणावर गोळीबार
प्रत्येक निवडणुकीगणिक काही लोक नियोजनपूर्वक इतरांची मतं कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं जात आहे. आपण आत्तापर्यंत हे ऐकत आलो होतो. आता आम्हाला त्याचा १०० टक्के पुरावा सापडला आहे. मी १०० टक्के पुराव्याशिवाय आता काहीही बोलणार नाहीये. माझं माझ्या देशावर, इथल्या लोकशाहीवर प्रेम आहे. आता निर्णय तुमचा आहे, मी फक्त तुमच्यासमोर पुरावा मांडणार आहे.