‘मन की बात’मध्ये मोदींकडून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
![Modi holds high-level meeting for Indians stranded in Ukraine](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Modi-7-1.jpg)
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. कार्यक्रमाचा हा 86 वा भाग होता. यावेळी त्यांनी व्होकल फॉर लोकल, चोरीला गेलेल्या मुर्त्या, आंतरराष्ट्रीय महिला दिन, आयुर्वेद आणि स्टार्ट-अप्सवर भाष्य केले. तसेच आजच्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस देखील आहे. ‘सर्व मराठी बंधू भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छाही दिल्या.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आपण मातृभाषा दिन साजरा केला. यातील तज्ज्ञ लोक मातृभाषा शब्द कोठून आला, त्याची उत्पत्ती कशी झाली याबाबत अधिक माहिती देऊ शकतात. जशी आपली आई आपले आयुष्य घडवते, तशीच मातृभाषा आपले जीवन घडवते. भारतात जगातील सर्वात जुनी भाषा असलेली तमिळ भाषा आहे. 2019 मध्ये हिंदी जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषांच्या यादीत तिसर्या क्रमांकावर होती. आजच्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस देखील आहे. ‘सर्व मराठी बंधू भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी देखील काही लोक मानसिक द्वंदात आहेत. त्यामुळे त्यांना आपली भाषा, आपला पोशाख, आपली खाद्यसंस्कृती याबाबत संकोच वाटतो. खरंतर जगात असे कोठेही दिसत नसल्याचेही मोदींनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भारताने इटालीतून आपली एक बहुमूल्य असा वारसा असलेली अवलोकितेश्वर पद्मपाणिची हजार वर्षांहूनही प्राचीन अशी मूर्ती आणली आहे. या मूर्तिंमध्ये भारताचा आत्मा, श्रद्धेचा अंश आहे. या मूर्तिंचे एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्वही असल्याचे मोदी म्हणाले.