breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

आनंदाची बातमी ! लाडकी बहीण योजनेचे 3 हजार जमा होण्यास सुरुवात

मुंबई : राज्य सरकारची सर्वात मोठी आणि महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे. राज्य सरकारे 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आजपासूनच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते राम सातपुते यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.

3-4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनचे पवित्र औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम, प्रत्येकी 3000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. 31 जुलै नंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे असे ट्विट राम सातपुते यांनी केले आहे.

हेही वाचा –  ‘आम्ही राज्याला प्रगतीपथावर नेले’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्वातंत्र्यदिनी प्रतिपादन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत सुमारे 1 कोटी 45 लाख 76 हजार महिलांनी नोंदणी केलेली आहे. आणि त्यातील एकूण 1 कोटी 34 लाख 30 हजार 784 अर्ज पात्र ठरले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 01 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button