Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी

Gold Rate | सोन्याचे दर २७००० रुपयांनी घसरणार; बड्या कंपनीचा मोठा दावा!

Gold Rate | भारतात सोन्याच्या दरांनी गेल्या आठवड्यात १ लाखांचा टप्पा पार केला होता, त्यानंतर दरांमध्ये थोडीशी घसरण झाली होती. काही संस्थांकडून सोन्याचे दर पुढच्या वर्षापर्यंत १ लाख ६ हजार रुपयांपर्यंत राहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मात्र, सोन्याच्या खाणकामातील नामांकित कंपनी सॉलिडकोरने भारतात सोन्याचे दर ७० हजार रुपयांवर येतील असा दावा केला आहे. म्हणजेच सोन्याचे दर २७०००रुपयांनी घसरतील. नेमका काय आहे हा दावा जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून..

सोन्याबाबतच नेमका दावा काय?

कझागिस्तानमधील सोन्याच्या खाणकामातील नामांकित कंपनी सॉलिडकोर रिसोर्सेसचे सीईओ विटाली नेसिस यांनी एक मोठा आणि आश्चर्यचकीत करणारा दावा केला आहे. त्यांच्या मते पुढील १२ महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळेल. विटाली यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की पुढील वर्षात सोनं २५०० डॉलर प्रति औंसवर आलेले असतील.

हेही वाचा   :    ‘पीएमआरडीए’ हद्दीत दाेन टीएमसी पाण्याची तूट! 

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर ३३१९ डॉलर प्रति औंस इतके आहेत. विटाली नेसिस यांच्या मते सोन्याचे दर २५ टक्क्यांनी घसरतील.

दरम्यान, सॉलिडकोर रिसोर्सेस ही कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात लिस्ट असलेली मोठी कंपनी आहे. त्यामुळे या कंपनीचे सीईओ विटाली नेसिस यांनी केलेला दावा येत्या काळात कितपत योग्य ठरेल हे पाहणे आवश्यक असेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button