सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण, नवे दर काय?
![Gold has become cheap, the price of silver has also fallen](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Gold-Price-Today--780x470.jpg)
Gold Price Today | सध्या सोने चांदी खरेदीदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज सोमवारी सोन्याचा भाव घसरले आहेत. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज ५ फेब्रुवारी २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्याची किंमत ६३२२ रुपये प्रति ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत ५७९५ रुपये प्रति ग्रॅम आहे.
आज सोने-चांदीचा दर काय?
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात १५० रुपयांची घसरण झाली आहे. आज, ५ फेब्रुवारी २०२४ रोजी, संपूर्ण भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या किमती वेगवेगळ्या आहेत. २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम सोन्यासाठी ६३,२२० रुपये मोजावे लागत आहेत. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची सरासरी किंमत ५७,९५० रुपये होती, तर १८ कॅरेट सोन्याची ४७,४१० रुपये प्रतितोळा आहे.
हेही वाचा – ‘आम्हाला देशातली तीन मंदिरं शांततापूर्ण प्रक्रियेतून मिळाली, तर..’; गोविंद देव गिरी महाराजांचं विधान चर्चेत
आज चांदीचा भाव काय?
आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदी ३०० रुपये प्रतिकिलो दराने स्वस्त झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर ७५,२०० रुपये प्रति किलो आहे.