सोनं स्वस्त की महाग? जाणून घेऊयात वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात मौल्यवान धातूचे दर
Gold Silver Rate | नववर्षाला सोने, चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. वर्षाअखेरीस मौल्यवान धातुमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या दोन आठवड्यात सोने तीन हजारांहून अधिक स्वस्त झाले. तर चांदी ७ हजारांहून अधिक उतरली आहे.
गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने ७१,१५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७७,६०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर मागील आठवड्यात चांदी ६,५०० रुपयांनी वधारली होती. मात्र आता गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ९१,५०० रुपये इतका आहे.
हेही वाचा – ‘संविधानातील सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे, तर..’; नितीन गडकरींचं विधान
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) २४ कॅरेट सोने ७६,०१३, २३ कॅरेट ७५,७०९, २२ कॅरेट सोने ६९,६२८ रुपयांवर आहे. तर १८ कॅरेट आता ५७,०१० रुपये, १४ कॅरेट सोने ४४,४६८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे.