सोने-चांदीच्या दरवाढीची सलामी; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price | गेल्या आठवड्यात सोन्या चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच आज गुडरिटर्न्सनुसार, २२ कॅरेट सोने ६६,८०० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,८६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
चांदीत गेल्या आठवड्यात ६ हजारांची स्वस्त झाली होती. त्यापूर्वी चांदीने १२,००० रुपयांची भरारी घेतली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्या पाठोपाठ चांदीने पण भरारी घेतली. अशातच आज गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ९३,००० रुपये आहे.
हेही वाचा – प्रेमप्रकरणातून तरूणाला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न, पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी वधारली. २४ कॅरेट सोने ७२,१९१ रुपये, २३ कॅरेट ७१,९०२ रुपये, २२ कॅरेट सोने ६६,१२७ रुपये झाले. १८ कॅरेट ५४,१४३ रुपये, १४ कॅरेट सोने ४२,२३२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव ९०,८११ रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.





