Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जीओचा नवा स्वस्त स्मार्ट फोन; गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बाजारात
![Geo's new cheap smart phone; In the market on the occasion of Ganesh Chaturthi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/5e453043ec50a5a30a18320c42c089b1_original.jpg)
नवी दिल्ली – जीओ कंपनीच्या नव्या स्मार्ट फोनची उत्सूकता सर्वाना वाटत असून हा स्वस्त स्मार्टफोन गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजेच १० सप्टेंबर रोजी बाजारात दाखल होणार आहे. या स्मार्टफोनची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 2021 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) केली होती. हा फोन सुमारे साडे तीन हजारापासून मिळणार असल्याची माहिती हाती आली आहे.
रिलायन्स जिओचा हा फोन दोन व्हेरियंट बेसिक आणि अडवॉन्स्डमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी स्कीम अंतर्गत फोन ऑफर करण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.