ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

साईबाबा संस्थानाला दिले एक कोटीचे ‘एक्स-रे’ मशीन

भक्ताकडून साई चरणी मोठं दान

शिर्डी : ‘सबका मालिक एक’ आणि ‘श्रद्धा सबुरी’चा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या झोळीमध्ये देश विदेशातील साई भक्त भरभरून दान करत असतात. मंगळवारी एका साई भक्ताने साई चरणी मोठे दान करत साईबाबा संस्थानच्या रुग्णालयाला एक कोटी रुपयांचे एक्स-रे मशीन दान स्वरूपात दिले आहे. या दानामुळे साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा घेता येणार आहे.

साईबाबा संस्‍थानचे साईबाबा हॉस्पिटल व साईनाथ रुग्‍णालयाच्‍या एक्‍स रे विभागाकरीता मायलॉन लॅब्रेाटरीज यांचेकडून एकूण ०१ कोटी १५ लाख रूपये किंमतीचे दोन अद्यावत एक्‍स-रे मशिन देणगी स्‍वरुपात प्राप्‍त झाले असल्‍याची माहिती साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. सदर मशीन साईबाबा हॉस्पिटल व साईनाथ रूग्‍णालयाच्‍या एक्‍स-रे विभागात बसविण्‍यात येऊन त्‍यांची मायलॉन कंपनीचे अध्‍यक्ष राजीव मलिक व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सिमा मलिक यांचे हस्‍ते पुजा करुन उदघाटन करण्‍यात आले.

यानंतर साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्‍ते देणगीदार साईभक्‍त राजीव मलिक व सिमा मलिक यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी मायलॉन कंपनीचे व्‍यवस्‍थापक जितेंद्र खैरे, साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकिय संचालक डॉ. प्रितम वडगावे, वैद्यकिय अधिक्षीका डॉ. मैथिली पितांबरे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, अधिसेविका मंदा थोरात, नजमा सय्यद, बायोमेडीकल विभागाचे इंजिनिअर राजेश वाकडे, तुषार कुटे, श्रध्‍दा कोते व स्‍टोअर किपर सुनिल निकम आदी उपस्थित होते. मायलॉन लॅब्रेाटरीज कंपनीच्‍या वतीने संस्‍थान रूग्‍णालयाकरीता यापुर्वी सुमारे १ कोटीहून अधिक किंमतीच्‍या विविध मशिनरी व अॅम्‍बुलन्‍स देणगी स्‍वरुपात मिळाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button