Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

एलपीजी पासून सीएनजीपर्यंत… १ फेब्रुवारीपासून देशात या ५ गोष्टी बदलणार

Rule Change 1 February: २०२६ मधील पहिला महिना जानेवारी महिना संपणार आहे. १ फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन या यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याचबरोबर एक फेब्रुवारीपासून देशात अनेक बदल देखील होणार आहेत. याच बदलांचा थेट परिणाम आपल्या घरांवर होणार आहे.

पहिला बदल

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ऑईल कंपन्या या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करत असतात. १ फेब्रुवारी २०२६ ला देखील नवीन एलपीजी किंमती जाहीर होणार आहेत. अर्थसंकल्पाचे दिवस असल्यानं या किंमतीकडे सपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. १४ किलोच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत काही बदल होण्याची अपेक्षा नागरिक करत आहेत.

गेल्या काही काळापासून १९ किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किंमतीत सतत बदल करण्यात येत होते. आता देखील यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

दुसरा बदल

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीतील बदलासोबतच कंपन्या १ फेब्रुवारीपासून सीएनजीमध्ये देखील बदल करण्याची शक्यता आहे. तसेच ATF अर्थात हवाई इंधनाच्या किंमतीत देखील बदल करण्याची शक्यता आहे. यामुळे विमान प्रवासाच्या किंमतीवर याचा परिणाम होतो. गेल्या महिन्यात एटीएफ किंमतीत कपात करण्यात आली होती. दिल्लीत ATF Price 7% च्या आसपास कमी करण्यात आली होती. त्याचबरोबर सीएनजी – पीएनीजीच्या किंमतीत देखील बदल होण्याची शक्यता आहे.

तिसरा बदल

एक फेब्रुवारीपासून पान मसाला आणि सिगरेटच्या शौकिनांना मोठा झटका लागू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार १ फेब्रुवारी २०२६ पासून तंबाखू उत्पादने आणि पान मसाला यांच्यावर अधिक कर लागू शकतो. पीटीआयच्या वृत्तानुसार सरकारने जीएसटीमध्ये काही बदल अधिसूचित केले आहेत. त्यामुळे काही दिवसात पान मसाला आणि तंबाखू जन्य उत्पानांवर अतिरिक्त जीएसटी लागू शकतो. त्यामुळे पान मसाला आणि सिगरेटचे दर वाढू शकतात.

हेही वाचा – समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाला वेग…९० टक्के भूसंपादन पूर्ण

चौथा बदल

१ फेब्रुवारी २०२६ पासून फास्टॅग युजर्ससाठी देखील नियम बदलले जाण्याची शक्यता आहे. NHAI ने १ फेब्रुवारीपासून कार, जीप आणि व्हॅन साठी FASTag केवासी व्हेरिफिकेशन प्रोसेस डिसकन्टिन्यू करण्यात आळी आहे. हा लोकांसाठी एक मोठा दिलासा मानला जात आहे.

पाचवा बदल

फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवात ही रविवारच्या सुट्टीने होत आहे. जर तुम्हाला बँकेच्या संदर्भात काही महत्वाची कामे असतील तर तुम्ही या महिन्यातील बँक हॉलिडेची लिस्ट पाहून घ्या. ही लिस्ट रिजर्व बँक ऑफ इंडिया आपल्या वेबसाईटवर अपलोड करत असते. या महिन्यात जवळपास १० दिवस बँक हॉलिडे असणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button