२६ जानेवारीला प्रभावी भाषण करायचं असल्यास या टिप्स फॉलो करा!
![Follow these tips to make an effective speech on January 26](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Republic-Day-2024-1-780x470.jpg)
Republic Day 2024 | २६ जानेवारी हा दिवस आपल्या देशात ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा भारत देश आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. २६ जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी खूप खास आणि महत्त्वाचा दिवस आहे. या प्रजासत्ताक दिनी जर तुम्हाला शाळा, महाविद्यालयात चांगले भाषण द्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला भाषण सादर करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.
प्रजासत्ताक दिनाला ‘या’ टिप्स वापरून करा भाषण
जर तुम्ही शाळेत भाषण देत असाल तर भाषणाच्या सुरुवातीला उपस्थित पाहुणे, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा द्या.
हेही वाचा – आझाद मैदानावरील पोलिसांनी परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील म्हणाले..
सगळ्यांना अभिवादन केल्यानंतर आपला परिचय द्या.
यानंतर प्रजासत्ताक दिनाचा इतिहास सांगा आणि प्रजासत्ताक दिन कितवा आहे याची माहिती द्या.
यानंतर देशांची राज्यघटने संदर्भात माहिती द्या.
प्रजासत्ताक दिनी भाषणादरम्यान तुम्ही योग्य वाटणाऱ्या कविता आणि शायरी त्यात समाविष्ट करू शकता.
भाषणाच्या शेवटी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार माना. शेवटी, कृतज्ञता व्यक्त करताना आपण काही कविता किंवा शायरीची मदत देखील घेऊ शकता.