नेपाळमध्ये भीषण बस अपघात; त्रिशुली नदीत बस कोसळून १९ ठार, २५ जखमी

Nepal Bus Accident | नेपाळमध्ये एक भीषण बस अपघात घडला असून पोखराहून काठमांडूकडे जाणारी प्रवासी बस त्रिशुली नदीत कोसळून किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन न्यूझीलंडमधील पर्यटकांचा समावेश असून २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. बस पोखराहून काठमांडूकडे जात असताना पृथ्वी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत कोसळली. बसमध्ये एकूण ४४ प्रवासी प्रवास करत होते.
हेही वाचा : मशाल दौड, सायकलिंग, गडचढाई व मर्दानी खेळांचे दैदिप्यमान सादरीकरण

प्राथमिक माहितीनुसार, धाडिंग जिल्ह्यातील बेनीघाट रोरांग ग्रामीण नगरपालिका-५ मधील भैसेपाटी परिसरात हा अपघात झाला. बस सुमारे ३०० मीटर खोल त्रिशुली नदीच्या पात्रात कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली.
अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींवर उपचार सुरू असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.




