Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी
HDFC बँकेच्या ग्राहकांवरील EMI चं ओझं कमी होणार; मिळणार मोठा दिलासा!
![EMI burden on HDFC Bank customers will be reduced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/HDFC-Bank-780x470.jpg)
HDFC Bank | तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग म्हणजेच MCLR मध्ये बदल केला आहे. मार्जिनल कॉस्टमध्ये बदल झाल्यामुळे आता गृहकर्ज, कार लोन, पर्सनल लोन, शैक्षणिक कर्ज आदी प्रकारच्या कर्जांवरील व्याजात बदल होणार आहे.
मार्जिनल कॉस्ट कमी झाल्यामुळे ग्राहकांना थेट फायदा होणार आहे. ग्राहकांवरील EMI चं ओझं कमी होणार आहे. नवा दर ७ जूनापासून लागू झाला आहे. बँकेचा एमसीएलआर ८.९५ टक्के ते ९.३५ टक्क्यांमध्ये आहे.
हेही वाचा – भोसरीत आढळले कॉलराचे दोन रूग्ण, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
सध्या बँकेचा तीन महिन्याचा MCLR ९.१५ टक्के आहे. सहा महिने कर्जाच्या मुदतीचा MCLR ९.३० टक्के झाला आहे. एक ते दोन वर्षांमधील मुदतीच्या कर्जावरील एमसीएलआर ९.३० टक्के असेल.