ताज्या घडामोडी

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात लवकरच नवी कार लाँच

सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने पहिल्या ई-बॉर्न कार eVitara चा टीझर जारी

दिल्ली : इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात लवकरच नवी कार लाँच होणार आहे. या कारची टक्कर मोठं मोठ्या कंपनांच्या इलेक्ट्रिक कार सोबत होणार आहे. कारण टाटा मोटर्स कंपनीने या सेगमेंटमध्ये त्यांच्या कार लाँच करून मजबूत उपस्थिती दर्शवली आहे, तर महिंद्रा अँड महिंद्राने यापूर्वीच XEV 9e आणि BE 6 या आपल्या दोन इलेक्ट्रिक कार लाँच करून बाजारपेठेत अधिक नाव कमावले आहे. आता देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने त्यांच्या पहिल्या ई-बॉर्न कार eVitara चा टीझर आणि काही तपशील जारी केले आहेत. या कारमध्ये असे काही खास टेक्नॉलॉजी असणार आहे जी ऑटो एक्स्पोमध्ये लाँच होणार आहे. चला तर याचे फीचर्स जाणून घेऊयात

eBorn कार या इलेक्ट्रिक कार म्हणून विकसित केल्या जातात म्हणून त्यांना eBorn कार म्हणतात.दरम्यान महिंद्रा कंपनीने त्यांच्या दोन्ही कार इलेक्ट्रिक एसयूव्ही बनवल्या आहेत. तर टाटा मोटर्सच्या गाड्या पेट्रोल आणि डिझेल कारपासून इलेक्ट्रिकमध्ये रुपांतरित करून तयार केल्या आहेत. तर या इलेक्ट्रिक फ्लॅटफॉर्म वर मारुती कंपनीचा दावा आहे की, त्यांची eVitara कार ही ईबॉर्न eBorn कार आहे.

eVitara कारमध्ये असतील ‘ही’ वैशिष्ट्ये
मारुती सुझुकी इंडिया या कंपनीचे म्हणणे आहे की, ही कार HEARTECT-e platform वर तयार करण्यात आली आहे. कंपनीने बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (बीईव्ही) खास डिझाइन केले आहे. हे तांत्रिकदृष्ट्या अशा प्रकारे डिझाइन करण्यात आले आहे की ज्यामुळे इलेक्ट्रिक कारची सुरक्षितता वाढेल. या कारमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.eVitaraबाबत कंपनीचा दावा आहे की, यामुळे लोकांना ड्रायव्हिंगचा वेगळा आणि उत्तम अनुभव मिळेल.

Bharat Mobility Global Expo 2025 मध्ये कार होणार लाँच
मारुती सुझुकी इंडिया ही कार भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये भारतात आणत आहे. पूर्वी याला ऑटो एक्स्पो म्हटले जायचे. कंपनीने नुकतीच इटलीतील मिलान मध्ये ही कार सादर केली आहे.

मारुती सुझुकीची ई-विटारा भारतात तयार करण्यात आली असून हे कंपनीचे ग्लोबल मॉडेल आहे. म्हणजेच भारतीय बनावटीची ईविटारा जगभरात अशाच पद्धतीने पुरवली जाणार आहे. या कारच्या लाँचिंगसोबत कंपनी चार्जिंग इकोसिस्टम सुधारण्याच्या दिशेनेही काम करणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button