ताज्या घडामोडीराष्ट्रिय
सातार्यात कोयना धरण परिसरात भूकंप
![Earthquake in Koyna Dam area in Satara](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/178681-earth.jpg)
सातारा | सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात आज भूकंपाचे हादरे बसले. हा भूकंप सौम्य स्वरुपाचा असल्याने कोणतीही वित्त आणि जीवितहानी झालेली नाही. या भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवाने भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतेही नुकसान झालेले नाही. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोयना धरण परिसरात आज दुपारी जवळपास सव्वा दोन वाजेच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिदू हेळवाक गावच्या नैऋतेस सहा किमी अंतरावर होता. कोयनेपासून हे केंद्रबिंदू आठ किमी इतक्या अंतरावर होती.