Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

पुढच्या ४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर..; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

Donald Trump | अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर इराणने आखाती देशांवर दबाव आणण्यासाठी जगातील अत्यंत महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीत अंशतः नाकेबंदी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, इंधनाचे दर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी म्हटले आहे की, पुढील ४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे आणि पूर्णपणे जलप्रवासासाठी खुली करण्यात आली नाही, तर अमेरिका इराणच्या सर्वात मोठ्या वीज प्रकल्पापासून सुरुवात करून विविध ऊर्जा प्रकल्पांवर कारवाई करेल.

हेही वाचा       :              सामान्य पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ नाही: केंद्र सरकारची माहिती

इराणच्या या कृतीमुळे जागतिक सागरी सुरक्षा आणि ऊर्जा पुरवठ्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक देशांनी इराणच्या भूमिकेचा निषेध नोंदवला असून, शनिवारी ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांनीही या निषेध मोहिमेत सहभाग घेतला. त्यामुळे इराणविरोधात भूमिका घेणाऱ्या देशांची संख्या आता २२ वर पोहोचली आहे.

ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि जपान यांसारख्या प्रमुख देशांनीही इराणच्या नाकेबंदीचा तीव्र निषेध केला आहे. मध्यपूर्वेतील या वाढत्या तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा बाजारावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button