Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

पीकेंच्या सहाय्याने काँग्रेसचे सचिन पायलट घेणार नवी भरारी

सचिन पायलट हे येत्या काही दिवसात आपला नवा पक्ष स्थापन करण्याची शक्यता

Share On

जयपूरः

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट येत्या काही दिवसात राजस्थानच्या राजकारणात मोठा भूंकप करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसण्याचे चित्र आहे.

सचिन पायलट हे येत्या काही दिवसात आपला नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे समजते. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (PK) यांच्या मदतीने सचिन पायलट हे नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे वृत्त आहे. ‘पीके’यांची आयपीएसी या कंपनीशी पायलट यांनी करार केल्याची माहिती समोर येत आहे. या महिन्यात पायलट नवीन पक्ष स्थापन करतील, असे बोलले जाते. सचिन पायलट हे पुन्हा एकदा गहलोत यांच्यापासून नाराज असल्याचे समजते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button