खासदार दत्तक गावांचा विकासप्रवास संथ!
![Development journey of MP adopted villages slow!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/village-adoption.jpg)
- राज्यात पहिल्या टप्प्यातील ५३ टक्केच योजना पूर्ण
नागपूर |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सत्ता स्वीकारल्यानंतर खासदार आदर्श ग्राम योजनेची घोषणा केली होती. त्या अंतर्गत २०१४ ते २०१९ या पहिल्या टप्प्यात राज्यातील खासदारांनी दत्तक घेतलेल्या ७० गावांमध्ये एकूण ५०१२ योजना सुरू करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २,७२९ योजनांची (५३ टक्के) कामे पूर्ण झाली आहेत. प्रत्येक खासदाराने त्यांच्या मतदारसंघातील गाव दत्तक घेऊन त्याचा ‘आदर्श’ विकास करावा ही संकल्पना या योजनेमागे होती. योजनांसाठी वेगळा निधी मिळणार नव्हता. जिल्हा नियोजन समितीकडून किंवा केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येक ग्रामपंचायतीला जो निधी मिळतो त्यातूनच गावात आवश्यक असणारा पाणीपुरवठा, वीज, रस्ते, शिक्षण, जलसंधारण, व्यायामशाळा व इतर पायाभूत सुविधांची निर्मिती करायची होती.
केंद्रीय ग्राम विकास विभागाच्या आकडेवारीनुसार, पहिल्या टप्प्यात राज्यात खासदारांनी दत्तक घेतलेल्या एकूण ७० गावांमध्ये ग्राम विकासाच्या ५,२१२ योजनांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २,७७९ योजनांची कामे पूर्ण झाली, ६४१ योजनांची कामे अजूनही सुरू आहेत. तर १७९२ कामांना सुरुवातच व्हायची आहे. २०१९ पासून योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाचगाव हे गाव दत्तक घेतले होते. या गावाचा कल्पकतेने विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शासनासोबतच खासगी कंपन्यांच्या सीएसआर निधीतून त्यांनी काही नावीन्यपूर्ण योजना येथे राबवल्या. त्यात महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्याची व पर्यावरण संरक्षणासाठी झाडे लावण्याच्या योजनेचा समावेश आहे.
खासदार आदर्श ग्राम ही योजना ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातून उत्तम आहे. खासदारांना दत्तक गावाचा विकास करताना सरकारी योजनांची अंमलबजावणी करून लोकांना त्याचा फायदा करून द्यायचा आहे. खासदारांनी यात लक्ष घातल्यास अंमलबजावणीतील अडचणी लक्षात येतात व त्यादृष्टीने ते काही उपाय सुचवू शकतात. याचा फायदा यंत्रणेला तसेच लोकप्रतिनिधींनाही होतो. मी दत्तक घेतलेल्या गावात त्याची योग्य अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न के ला आहे.
– पद्मश्री, खासदार डॉ. विकास महात्मे, नागपूर.
- पहिल्या टप्प्यातील योजना
’ सुरू झालेल्या कामांची संख्या – ५२१२
’ कामे पूर्ण झाली – २,७७९
’ कामे सुरू – ६४१