उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले विविध मंडळांच्या गणेशाचे दर्शन
![Deputy Chief Minister Devendra Fadnavis took darshan of Ganesha from various circles](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/New-Project-28-1.jpg)
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. यात बहुतांश मंडळे त्यांच्या दक्षिण- पश्चिम नागपूर मतदारसंघातील आहेत. फडणवीस यांचे मंगळवारी दुपारी चार नंतर नागपुरात आगमन झाले. रात्री त्यांनी बजाज नगर युवक गणेश उत्सव मंडळ, लक्ष्मीनगर गणेश उत्सव मंडळ, अभ्यंकर नगर सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ, माधवनगर गणेश उत्सव मंडळ, प्रतापनगर येथील बालगणेश उत्सव मंडळ आणि साहस गणेशोत्सव मंडळांच्या गणेशोत्सवाला भेटी दिल्या.
या शिवाय छत्रपती गणेशोत्सव सांस्कृतिक व क्रीडा मंडळ छत्रपती नगर, हनुमान सेवा समिती सावित्री विहार, न्यू मनीष नगर का राजा गणेश उत्सव मंडळ, जयप्रकाश नगर गणेश उत्सव मंडळ, श्री गणेश उत्सव मंडळ एचबी ईस्टेट सोनेगाव, नव चेतना गणेशोत्सव मंडळ दीनदयाल नगर स्वावलंबी नगर, श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ भेंडे ले आऊट, शिव गणेश उत्सव मंडळ शिव विहार कॉलनी दाते नगर जयताळा यासह इतरही गणेश मंडळांचेही दर्शन घेतले.