breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

#COVID19: आता चेकपोस्टवरच वाहने होणार निर्जंतुक; वर्धा जिल्ह्याचा प्रतिबंधात्मक उपाय

वर्धा । महाईन्यूज । प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा रुग्ण आढळला नसून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत. आणखी खबरदारीचा उपाय म्हणून आता  16 नाक्यावर  जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या जीवणावश्यक वस्तूंच्या वाहनांना  चेक पोस्टवरच  निर्जंतुक करण्यात येणार आहे. यासाठी खास प्रणाली लावण्यात राबविण्यात येणार आहे. यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनांमार्फत जिल्ह्यात कोरोनाच्या  प्रवेशास प्रतिबंध बसेल.

कोरोनामुक्त जिल्हा ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या आहेत.  शिवाय कोरोना बाधित  जिल्ह्यातून होणारी भाजीपाल्याची आवक थांबविण्यात आली आहे, तर वर्धा जिल्ह्यातून कोरोना बाधित जिल्ह्यात वाहतुकीसही प्रतिबंध लावण्यात आलेला आहे.

 इतर जिल्ह्याच्या सीमा वर्धा जिल्ह्याला मिळणाऱ्या 16 ठिकाणी प्रशासनामार्फत  तपासणी नाके लावले आहेत. यामध्ये सेलडोह, शिरपूर, आपटी फाटा (पुलगाव), वानरवीर (हिंगणी), येरला, बडबडी, अंदोरी, देऊरवाडा, खडका, सावळी(जुनापाणी), दुर्गवाडा,(वरुड- आष्टी), बेलोरा, कापशी, खेक, गिरड, खांबाडा(समुद्रपूर- चंद्रपूर)  याठिकाणांचा  समावेश आहे. इथे स्थिर निगराणी पथक तैनात आहे. 

 कोरोना  विषाणु वर्धा जिल्ह्यात शिरु नये म्हणुन वर्धा जिल्ह्यातील या 16  तपासणी नाक्यावर आता जीवणावश्यक वस्तू घेऊन येणारे  प्रत्येक वाहन निर्जंतुक होणार आहे. यासाठी प्रत्येक नाक्यावर 4 पंप ठेवण्यात आले आहेत. तसेच 24 तासांसाठी तीन पथके प्रत्येकी 8 तास काम करणार आहेत. निर्जंतुकीकरणासाठी 1 टक्के हायपोक्लोराईड द्रावणाचा उपयोग करण्यात येईल. स्थानिक मजुरांच्या सहकार्याने येणारी जड वाहने निर्जंतुक करण्यात येतील.

त्याच सोबत प्रत्येक नाक्यावर आरोग्य पथक  ड्राइवर, क्लिनर, यांची वैद्यकीय तपासणी करणार आहे.  वाहना सोबत जास्तीत जास्त ड्राइवर सह तीन लोकांनाच आतमध्ये प्रवेश मिळणार आहे.

   याच प्रणालीची आज जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी वर्धा-नागपूर मार्गावरील सेलडोह येथील तपासणी नाक्यावर  पाहणी केली. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जगताप,  सहायक उपप्रादेशिक अधिकारी विजय तिराणकर, तहसीलदार महेंद्र सोनोने, नायब तहसीलदार दिगलमवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button