breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: देशात 24 तासांत कोरोनाचे 54,044 नवे रुग्ण; 717 मृत्यू
नवी दिल्ली: देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 54,044 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. तर 717 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 1,15,914 इतकी झालेली आहे. सध्या देशात 7,40,090 सक्रीय रुग्ण आहेत. ही संख्या कालच्या पेक्षा 8448 कमी आहे. तर आतापर्यंत 67,95,103 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. त्यापैकी 61,775 रुग्णांना कालच्या दिवसात रुग्णालयातून सुट्टी मिळालेली आहे.