breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: आज देशात 46,254 नवे रुग्ण; तर 514 मृत्यू
![The total number of corona infections in India is 1,11,92,088 with 18,327 new patients](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto-4.jpg)
नवी दिल्ली: आज देशात 46,254 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेले असून 514 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 83,13,877 वर पोहचला असून 1,23,611 मृतांची नोंद झालेली आहे. सध्या देशात 5,33,787 सक्रीय रुग्ण आहेत. ही संख्या मागील 24 तासांपेक्षा 7,618 ने कमी आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 76,56,478 इतकी असून मागील 24 तासांत 53,357 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.