breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोव्हॅक्सिनला २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीस परवानगी

नवी दिल्ली – भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असतानाच कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेत कोरोना संसर्गाचा धोका लहान मुलांना मोठ्या प्रमाणात असेल अशी भीती वैद्यकीय क्षेत्राकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणी करण्याची शिफारस तज्ज्ञ समितीने केली होती. सविस्तर चर्चेनंतर आता २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लशीच्या चाचण्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)ने कोव्हॅक्सिनच्या फेज II / III च्या क्लिनिकल चाचणीस मान्यता दिली आहे. भारत बायोटेक ५२५ निरोगी स्वयंसेवकांवर चाचण्या घेणार आहे. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, पाटण्यातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूरची ‘मेडीट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या संस्थांमध्ये ५२५ मुलांवर या चाचण्या करण्यात येणार आहेत.

लशीच्या मुलांवर चाचण्या करण्यावर २४ फेब्रुवारी रोजी चर्चा झाली होती, त्यावेळी कंपनीला सुधारित वैद्यकीय चाचण्या संचालन प्रक्रिया सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर तज्ज्ञ समितीने मंगळवारी याबाबत चर्चा केली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button