breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

#CoronoVirus:तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे नागपुरात मोठा धोका टळला

नागपूर : नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे  यांच्या निर्णयाने नागपूरवरील मोठं संकट टळलं आहे. तुकाराम मुंढे यांनी विरोध होत असतानाही नागपुरातील मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा परिसरातील अनेकांना क्वारंटाईन केलं. या क्वारंटाईन केलेल्यांपैकी तब्बल 43 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे या 43 जणांपासून इतरांना संसर्ग होण्यापासून टळलं.

नागपुरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा परिसरातील 43 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्वांना आधीच क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं. क्वारंटाईन असल्यामुळे या 43 जणांपासून अनेकांना कोरोनाचा संसर्ग टळला आहे. नागपुरातील मोमीनपुऱ्यातून पाच दिवसांत तब्बल 600 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. तर, सतरंजीपुरा परीसरातून यापूर्वीच जवळपास 1700 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. या दोन्ही परिसरातील एकूण 2300 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. संसर्गाचा धोका दिसताच आणखी काही लोकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे.

नागपुरातील सतरंजीपुरा परिसर मध्य भारतातील ‘कोरोना’ साखळीचं सर्वात मोठं केंद्रबिंदू ठरत आहे. एकट्या सतरंजीपुरा परिसरात कोरोना रुग्णांनी शंभरी गाठली आहे. या परिसरातील क्वारंटाईन करण्यात आलेल्या 43 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागपुरात कोरोना बाधितांचा आकडा 182 वर पोहोचला आहे.

मध्य भारतात एकाच परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळणारं सतरंजीपुरा हे एकमेव ठिकाण आहे. या परिसरातील कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी नागपूर महानगरपालिका युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे.

68 वर्षीय कोरोनाबाधित मृतकाच्या संपर्कात आल्याने सतरंजीपुरा परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने 60 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली . त्यानंतर इथली कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली.

सतरंजीपुरा परिसरात कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी मनपाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहे. या भागातील साधारण 1700 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. इथल्या नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या भागातली सर्व गल्ल्या सील करण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button