breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: २४ तासांत पाच हजारांहून अधिक रुग्ण
टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी देशात करोनाबाधितांची २४ तासांतील उच्चांकी नोंद झाली. गेल्या २४ तासांत ५,२४२ रुग्ण आढळल्याने सोमवारी एकूण रुग्णसंख्या ९६,१६९ झाली.
देशात आतापर्यंत ३६,८२४ रुग्ण बरे झाले असून, हे प्रमाण ३८.२९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत २७१५ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील एकूण मृतांची संख्या ३,०२९ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि दिल्ली या चार राज्यांत करोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत.
गेल्या आठवडय़ाभरात करोनाच्या रुग्णसंख्येत प्रतिदिन सुमारे तीन ते चार हजारांची वाढ झाली. रविवारी चोवीस तासांतील रुग्णसंख्या पाच हजारांसमीप होती. ती सोमवारी एका दिवसात पाच हजारांहून अधिक नोंदली गेली.