breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus | हिंगोलीत एका दिवसात नवे 25 रुग्ण

हिंगोली | हिंगोली जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यांमध्ये दररोज वाढ होत आहे. आज सकाळी 25 जवानांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच आखाडा बाळापूर येथील खासगी ट्रॅव्हल्स चालक 23 एप्रिल रोजी नांदेड येथील भाविकांना घेऊन पंजाबला गेला होता. तो 28 एप्रिल रोजी नांदेड येथे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय त्यांना कॉरंटाईन करण्यात आले होते.

त्याचा अहवाल शुक्रवारी सकाळी प्राप्त झाला असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्याच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत तो मूळ हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील रहिवासी आहे. तर यातील एका जनावर औरंगाबाद येथील धुत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 47 वर पोहचली आहे. यामध्ये मुंबई, मालेगाव येथे बंदोबस्त केलेले 41 जवान, जालना येथून आलेल्या जवानाच्या संपर्कातील चार वर्षीय बालक, एक महिला तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून आलेला एक 21 वर्षीय तरूण व सेनगाव तालुक्यातील जांभरूण रोडगे येथील पाच वर्षीय बालिकेचा समावेश आहे.

तर वसमत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यास रुग्णालयातून सुट्टी देण्यात आले आहे. एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने हिंगोलीकर यांच्या चिंतेत वाढ झाली असून आरोग्य विभागाकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. सुरुवातीला हिंगोली जिल्हा कोरोनामुक्त जिल्हा होता पण मालेगाव व मुंबईवरून आलेल्या एसआरपीएफ जवानांना कोरोणाची बाधा झाल्याने हा आकडा वाढत चालला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button