Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापूरात आढळले नवे १७ कोरोनाबाधित रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/cov-s-2.jpg)
सोलापुरात आज सकाळी नवे १७ करोनाबाधित रूग्ण आढळून आले. यात दहा पुरूष व सात महिला आहेत. यामुळे सोलापुरातील एकूण रूग्णसंख्या ३६० वर पोहोचली आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात करोनाशी संबंधित १४८ रूग्णांची चाचणी घेण्यात आली. त्यात १७ रूग्ण करोना पॉझिटिव्ह सापडले. आतापर्यंत करोनाने घेतलेल्या बळींची संख्या २४ इतकी झाली आहे. तर करोनामुक्त झालेल्यांची संख्या ११३ झाली आहे.