breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापूरचे महापौर कोरोनामुक्त
सोलापुरात करोनाचा फैलाव प्रचंड प्रमाणात वाढत असताना त्याची झळ महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह त्यांचे पती रमेश यन्नम यांनाही बसली होती. दहा दिवसांपूर्वी यन्नम दाम्पत्याला करोनाची बाधा झाल्याचे आढळून येताच त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले होते. अखेर शुक्रवारी सायंकाळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी करोनावर मात केली आहे. घरी पाठविताना त्यांच्यावर फुलांचा वर्षांव झाला आहे.