Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापुरात तीन डॉक्टरांनंतर नगरसेवकालाही कोरोनाची बाधा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/3-27.jpg)
सोलापुरात आज सोमवारी सायंकाळी सहापर्यंत करोनाबाधित नवे चार रूग्ण आढळून आले. यात एका नगरसेवकाचाही (वय ५८) समावेश आहे. आतापर्यंत करोना रूग्णांची संख्या ६१ वरून ६५ वर पोहोचली आहे. तीन डॉक्टर, परिचारिका आणि रूग्णालयातील अन्य एका महिला कर्मचा-यानंतर आता एक नगरसेवकही करोनाबाधित झाल्यामुळे सोलापूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.