breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापुरात कोरोनाच्या २० रूग्णांची भर; महिलेचा मृत्यू
सोलापुरात आज (शनिवारी) २० करोनाबाधित रूग्ण आढळून आले. यात एका मृत महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत करोनाबाधित रूग्णांची संख्या २१६ वर पोहोचली असून मृतांचा आकडादेखील १४ इतका झाला आहे. करोनाबरोबर ‘साथी’चा फैलाव वाढल्यामुळे मृतांची संख्या वाढत आहे.