breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
#CoronaVirus |सांगलीत कोरोनाचा पहिला बळी
सांगली | सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेत असणार्या विजयनगर येथील कोरोना बाधित व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती १७ एप्रिल पासून मिरजच्या कोविड विशेष रुग्णालयात उपचार घेत होती. या व्यक्तीवर उपचारासाठी हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने शर्तीचे प्रयत्न केले. मात्र यात त्यांना यश आले नाही आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.