#CoronaVirus: वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-260.png)
करोना आजाराचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इराण देशातील एका नागरिकाने नगर शहरात केलेल्या वास्तव्याचे आणि त्याच्या पलायनाचे गूढ निर्माण झाले आहे. या इराणी नागरिकासह हॉटेलचा मालक व व्यवस्थापक अशा तिघांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
इराणमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. महाराष्ट्रातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत, असे असताना हा इराणी नागरिक नगर शहरात स्वत:ची ओळख लपवून राहिला, त्याने बनावट कागदपत्रे दाखवून शहराच्या तारकपूर भागातील सिंग रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये एक दिवस वास्तव्य केले. शहरात सर्वत्र बंद असताना शहरातील हॉटेलमध्ये राहिला. करोना आजारापासून नागरिकांच्या जीवितास धोका आहे हे माहिती असूनही आपल्या कृतीमुळे धोकादायक कृत्य केले या आरोपावरून तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.