breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: राष्ट्रपती भवनातील एकाही कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा नाही!

राष्ट्रपती भवनातील एकाही कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झालेली नसल्याचे मंगळवारी राष्ट्रपतींच्या सचिवालयाकडून प्रसिद्ध झालेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रपती भवनाच्या परिसरात राहात असलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्य करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याचे आढळल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत. राष्ट्रपती भवनातील अन्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे स्वविलगीकरण करण्यात आले आहे.

सुमारे साडेतीनशे एकरात पसरलेल्या राष्ट्रपती भवनाच्या देखभालीसाठी असलेले कर्मचारी आपल्या कुटुंबांसह याच आवारात राहतात. त्यापैकी एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्य करोनाबाधित नातेवाईकाच्या संपर्कात आलेला होता. करोनाबाधित नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान १३ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या कर्मचाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला विलगीकरण केंद्रात स्थलांतरित करण्यात आले असल्याचे निवदेनात म्हटले आहे.

करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्याच्या सर्व कुटुंबाची नमुना चाचणी करण्यात आली असून त्यांना बाधा झालेली नसल्याचे आढळले. राष्ट्रपती भवनाच्या आवारात राहाणाऱ्या एकाही कर्मचाऱ्याला, कुटुंबातील सदस्याला करोनाची बाधा झालेली नाही. मात्र, या कुटुंबांना स्वविलगीकरण करण्यास सांगण्यात आले असून त्यांनी घराच्या बाहेर न पडण्याचा आदेश देण्यात आला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू कुटुंबाला पुरवल्या जात आहेत. राष्ट्रपती भवनातील ये-जा देखील नियंत्रित करण्यात आली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. शंभरहून अधिक कुटुंबांनी स्वविलगीकरण केले असल्याचे सांगितले जाते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button