breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus | येत्या दोन वर्षात कोरोनाचा नायनाट होईल ; WHO प्रमुखांना विश्वास

नवी दिल्ली | जगभरात COVID-19 कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2.25 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. कोरोना विषाणूवरील लस शोधण्याचं काम जगभरात सुरु आहे. अशावेळी कोरोनाचा नायनाट येत्या दोन वर्षात होऊ शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)म्हटलं आहे.

WHO चे प्रमुख टेड्रोस अधानोम यांच्या मते, “आम्हाला आशा आहे की कोरोनाचं हे संकट कमीत कमी दोन वर्षात संपू शकेल. 1918 मध्ये जगभरात धुमाकूळ घालणारा स्पॅनिश फ्लूचा नायनाट होण्यासाठीही जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागला होता”

टेड्रोस अधानोम म्हणाले, “सध्याच्या कोरोनाकाळात आम्ही आता अधिक सक्षम झालो आहोत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठीचं आवश्यक तंत्रज्ञान आणि माहिती उपलब्ध होत आहे”.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button